सावली माऊली (जि. नागपूर) येथील रेड्डी बंधूंनी स्वतःच्या हॉटेलसाठी पूरक म्हणून छोटा गोठा सुरू केला होता. त्यात हळूहळू जनावरांच्या संख्येत वाढ होत दुग्धोत्पादनाचा व्यवसाय चांगलाच वाढला आहे. केवळ दर्जेदार दुधाची विक्री करून न थांबता ते प्रक्रिया पदार्थ निर्मिती आणि विक्रीतून चांगला फायदा मिळवत आहेत.- देवेंद्र वानखेडे
सावली माऊली (ता. कळमेश्वर, जि. नागपूर) येथील मनवर ऊर्फ मुन्ना रेड्डी नागपूर शहरातील हॉटेल व्यावसायिक आहेत. हॉटेल व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या ताज्या भाज्या आणि दूध यांचे उत्पादन आपणच करावे, या उद्देशाने सुरवातीला शेती आणि नंतर पशुपालनाकडे वळले. शेतीसाठी त्यांनी सावली माऊली येथे 22 एकर शेती विकत घेतली, त्यामध्ये ते पारंपरिक पद्धतीने भाजीपाल्याचे उत्पादन घेत असत. त्यातून जमीन आहे, पाणी आहे, मजूर आहेत, त्यांचा पुरेपूर वापर करण्यासाठी दूध उत्पादनाकडे वळले. हॉटेलपुरते दूध उत्पादन हाच त्यांचा मुख्य उद्देश होता, त्यासाठी त्यांनी आठ मुऱ्हा म्हशी आणि दहा हरियाणवी गाई विकत घेतल्या. टुमदार गोठा बांधून त्यांनी म्हशी- गाईंचे संगोपन सुरू केले. आपल्या हॉटेलमध्ये लागणारे 40 लिटर दूध इथपर्यंतच हा दुग्धव्यवसाय त्यांनी मर्यादित ठेवला.
वृत्तीने व्यावसायिक असलेले रेड्डी बंधू शेतीत नवीन पीक आणि तंत्र राबविण्याविषयी कृषी अधिकारी आणि तज्ज्ञांकडे सातत्याने चाचपणी करीत होते. मात्र, त्यांचे पशुपालन पाहिलेल्या तज्ज्ञांनी त्यांनी दुधाचाच व्यवसाय वाढविण्याचा सल्ला दिला. दर्जेदार दुधाला असलेली मागणी पाहून त्यांनी या व्यवसायात वाढ करण्याचा निर्णय घेतला. मग त्यासाठी त्यांनी एकदम 25 मुऱ्हा म्हशी विकत घेत आपल्या गोठ्यात वाढ केली. मजुरांची संख्या वाढविली.
जनावरांचे व्यवस्थापन... रेड्डींनी शेतातील पाण्याचे नियोजन करत चाऱ्यासाठी नेपियर गवताचे क्षेत्र पाच एकर, मका पिकाचे चार एकरपर्यंत वाढविले. या हिरव्या चाऱ्यासोबत अन्य पशुखाद्याचाही मेळ बसवला. पशुखाद्य बनविण्यासाठी पिठाची चक्की घेतली आहे. त्यात धान्यापासून पशुखाद्य बनविले जाते. कडबा, हिरवा चारा आणि पशुखाद्य यांचा योग्य वापर ते जनावरांसाठी करतात.
- जनावरांतील आजार कमी राहण्यासाठी जनावरांचा गोठा स्वच्छ असलाच पाहिजे, हा त्यांचा दंडक आहे. वेळच्यावेळी लसीकरण करतानाच पशुवैद्यकांच्या मदतीने जनावरांवर बारीक लक्ष ठेवले जाते.
- प्रत्येक जनावराने रोजच्या प्रमाणात दूध दिले की नाही, याकडे त्यांचा कटाक्ष असतो.
- दिवसातून दोन वेळा जनावरांना पाण्याने स्वच्छ केले जाते.
गोठा व संगोपनगृह... आता त्यांच्याकडे एकूण 48 जनावरे आहेत. त्यांच्या निवाऱ्यासाठी त्यांनी दोन गोठे बांधले आहेत. जनावरांना मोकळे फिरता यावे, यासाठी त्यांनी तीन एकर शेती तारांचे कंपाउंड टाकून बंदिस्त केली आहे. सकाळी दूध काढणी झाल्यावर या सर्व जनावरांना मोकळ्या जागेत सोडण्यात येते. या कंपाउंडमध्ये काही प्रमाणात खाद्य आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे.
आणि व्यवसाय फायद्यात आला... दुग्धोत्पादनाची सुरवात जरी हॉटेलच्या दूध गरजेसाठी झाली असली, तरी व्यवसाय वाढविल्यानंतर त्यांच्याकडील दुधाचे प्रमाण वाढले. बाहेरील डेअरी आणि अन्य मार्गांचा अवलंब त्यांनी विक्रीसाठी करून पाहिला; मात्र त्यातून त्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर दुधाच्या प्रक्रियेकडे लक्ष दिले. शहरात डेअरी सुरू करतानाच दुधापासून पनीर आणि दही तयार करण्याचे युनिट चालू केले. त्यांची विक्री सुरू केली, तरीही दूध शिल्लक राहत असल्याने त्यांनी बासुंदी, चक्का तयार करण्याचे काम सुरू केले. त्यांनी तयार केलेल्या पदार्थांना चांगली मागणी येऊ लागली. या पदार्थांच्या सोबतच दुधाचीही मागणी वाढली, त्यामुळे रेड्डी बंधूंची दुधाच्या विक्रीसाठीची काळजी संपली. आता ग्राहकच त्यांच्या दुधाची आणि दुधापासून तयार केलेल्या पदार्थांची वाट पाहत असल्याचे दिसून येते.
गोठा तंत्रज्ञान... - जनावरांसाठी शेण-मूत्राचा निचरा होण्यासाठी योग्य उतार व गटरची सोय असलेला गोठा तयार केलेला आहे, तरीही गोठ्याची नियमित सफाई, शेण लगेच उचलण्यासाठी मजुरांना ते तत्पर ठेवतात.
- दूध काढणी आणि अन्य कामांसाठी त्यांचा मजुरांवरच विश्वास आहे. अद्याप दूध काढणीचे यंत्र घेतलेले नाही. यंत्राचा वापर आणि स्वच्छता यासाठी स्वतः गोठ्याच्या परिसरामध्ये थांबण्याची आवश्यकता त्यांना वाटते, कारण दूध काढण्याच्या यंत्राची स्वच्छता योग्य प्रकारे न झाल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात.
- सध्या चारा कटाई आणि मिक्सिंग यासाठी यंत्राचा वापर केला जातो.
दर्जेदार उत्पादन... मनवर ऊर्फ मुन्ना रेड्डी यांनी आपल्या उत्पादनाच्या दर्जावर विशेष लक्ष दिले आहे.
- विनाकारण रासायनिक औषधांचा वापर टाळला जातो. नैसर्गिक चारा आणि पशुखाद्य देण्यावर त्यांचा भर असतो.
- जनावरांचे दूध काढताच ताजे दूध ग्राहकांपर्यंत पोचते केले जाते.
- प्रक्रिया उद्योगातही कुठल्याही अन्य पदार्थांचा वापर केला जात नाही. उत्पादनाचा दर्जा व चव सातत्याने स्थिर ठेवली जाते. ग्राहकांची वाढती मागणी हेच त्यांच्या मालाच्या गुणवत्तेचे निदर्शक ठरत आहे.
प्रगतीच्या दिशेने वाटचाल... रेड्डी बंधूंनी महाराष्ट्रातील अनेक अत्याधुनिक डेअरी प्रकल्पांना भेटी दिल्या असून, त्यांच्या व्यवस्थापन आणि पद्धतींचा आपल्या गोठ्यावर वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.
- कृषी प्रदर्शनांना भेट देणे हा त्यांच्या आवडीचा विषय असून, महाराष्ट्रात कुठेही चांगले प्रदर्शन ते शक्यतो चुकवीत नाहीत. त्यातून आपल्याला नवे काही करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे ते सांगतात.
उत्पन्नाचे अर्थशास्त्र... - सध्या त्यांच्याकडील 48 म्हशींपैकी 18 गाभण आहेत. अन्य म्हशींपासून 10 ते 12 लिटरप्रमाणे सुमारे 300 लिटर दूध मिळते.
- गाई दहा असल्या तरी जास्त दुधाची एकच होलस्टिन फ्रिजीयन गाय आहे, ती दिवसाला 25 लिटर दूध देते. इतर जर्सी आणि गावरानी गाईंचे मिळून रोज 75 लिटर दूध होते.
- दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री ते स्वतःच्या रेड्डीज गोकुळ डेअरीतून करतात. गाईचे दूध 45 रुपये लिटर, तर म्हशीचे 55 रुपये लिटरने विक्री केली जाते. या दराबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. शिल्लक दुधापासून विविध प्रकारची मिठाई बनवली जाते. त्याचप्रमाणे ऑर्डरप्रमाणे बासुंदी, दही, पनीर तयार करून विकत असल्याने अधिक नफा मिळतो.
- खाद्यासाठी तूर, मका, गव्हांडा, चना कुटार यांचा ते वापर करतात. हिरवे गवत जनावरांना दोन्ही वेळेस दिले जाते. यासाठी त्यांना 58 जनावरांसाठी 5800 रुपये खर्च येतो.
- जनावरांच्या कामासाठी दहा मजूर त्यांच्याकडे आहेत, त्यांच्या रोजच्या मजुरीसाठी दोन हजार रुपये खर्च होतो.
- दूध विक्रीतून त्यांना साधारणपणे म्हशीच्या दुधाचे 16,500, तर गाईच्या दुधाचे 3375 रुपये रोज मिळतात. एकूण 19,875 रुपये मिळतात. यातून मजुरी, चारा, औषध व वाहतुकीचा खर्च साधारणपणे 9 हजार होतो. हा खर्च वजा केल्यास दहा हजार रुपये निव्वळ नफा उरतो.
- जनावरांचे गोळा होणारे शेण आणि मूत्र यांचा वापर स्वतःच्या शेतासाठी खत म्हणून करतात, त्याची विक्री केली जात नाही.
संपर्क -
मनवर ऊर्फ मुन्ना रेड्डी, संचालक, रेड्डीज गोकुळ डेअरी
9326666382
Wednesday, April 17, 2013
गव्हांकुराच्या चाऱ्यातून दुधाळ गाईंचे केले पोषण
विंचुर्णी (ता. फलटण, जि. सातारा) येथील अनिल निंबाळकर यांनी दुष्काळी स्थितीतही चारा, पाणी व पशुखाद्य व्यवस्थापनात समतोल साधत दुग्ध व्यवसाय टिकवला आहे. पाण्याअभावी चारा उत्पादनाचे क्षेत्र घटले असताना निंबाळकर यांनी हायड्रोपोनिक्स तंत्राने गव्हांकुराच्या चाऱ्याची निर्मिती केली. त्यामुळे दुष्काळी स्थितीतही गाईंना पोषक आहार मिळतो आहे.
अमोल जाधव
फलटणच्या दक्षिणेस नऊ किलोमीटरवर विंचुर्णी हे गाव आहे. हे गाव पूर्णतः दुष्काळीपट्ट्यात येते. या गावात अनिल केशवराव निंबाळकर यांची 22 एकर शेती आहे. पाणीपुरवठ्यासाठी एक विहीर असून पाण्याच्या उपलब्धतेनुसार जिरायती पिके आणि जनावरांसाठी चाऱ्याची लागवड केली जाते. सन 1983 पासून निंबाळकर दुग्ध व्यवसायात आहेत. त्यांच्याकडे सहा होल्स्टिन फ्रिजीयन गाई, आठ कालवडी आणि तीन मुऱ्हा म्हशी आहेत. चाऱ्यासाठी त्यांच्याकडे ऊस, नेपिअर गवताच्या डीएचएन-6 जातीची तसेच कडवळाची लागवड असते. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याची कमतरता भासत आहे. चाऱ्याच्या कमतरतेमध्ये जनावरांना पोषक आहार देण्यासाठी त्यांनी गेल्या चार महिन्यांपासून गाईंच्या आहारात ऍझोला तसेच गव्हांकुराचा वापर सुरू केला आहे. या दोन्ही घटकांच्या आहारातील वापरामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत झाली आहे. हा पर्याय त्यांना फायदेशीर ठरला आहे.
...असे आहे गाईंचे व्यवस्थापन - - पाच वर्षांपूर्वी निंबाळकरांनी मुक्त संचार पद्धतीने गाईंचे संगोपन सुरू केले. गोठ्यातच एका बाजूला सावलीसाठी शेड असून तेथे गाईंना पाणी व गव्हाणीची सोय केली आहे. सकाळी सहा वाजता यंत्राद्वारे दूध काढणी केली जाते. त्यानंतर प्रत्येक गाईस 15 किलो गव्हांकुराचा चारा आणि सात किलो ओला व वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी दिली जाते.
- गोठ्यातील टाकीत पाणी भरलेले असते, त्यामुळे गाई दिवसभर गरजेनुसार पाणी पितात.
- सायंकाळी चार वाजता प्रत्येक गाईला दहा किलो ओला व वाळलेला चारा कुट्टी तसेच अर्धा किलो सरकी पेंड, दीड किलो गव्हाच्या भुसा, एक किलो ऍझोला, वीस ग्रॅम खनिज मिश्रण एकत्र करून दिले जाते. दररोज 15 ते 20 किलो मूरघास गाईंना दिला जातो. सायंकाळी सहा वाजता यंत्राद्वारे दुधाची काढणी होते.
-मुक्त संचार पद्धतीमुळे गाईंना चांगला व्यायाम होतो, त्या चांगल्याप्रकारे रवंथ करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहून दुधात सातत्य टिकते. गाईंना अंग घासण्यासाठी गोठ्यात मध्यभागी खांब उभा केला आहे. त्यावर गाईंना गरजेनुसार अंग घासता येते.
- दर तीन महिन्यांनंतर पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार जंतनिर्मूलन आणि शिफारशीनुसार लसीकरण केले जाते.
- गाई माजावर आल्यावर कृत्रिम रेतन पद्धतीचा वापर करून भरविल्या जातात.
- तीन म्हशींसाठी स्वतंत्र गोठा बांधला आहे.
हायड्रोपोनिक्स तंत्राने गव्हांकुर चारानिर्मिती - दुग्ध व्यवसायाच्यादृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाईंसाठी सकस चाऱ्याची उपलब्धता. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर विचार करत असताना निंबाळकरांना फलटण येथील गोविंद दूध डेअरीच्या माध्यमातून गव्हांकुरापासून चारानिर्मितीचा मार्ग गवसला. त्यांनी कृषी संशोधन केंद्र, मडगाव (गोवा) येथील गव्हांकुर चारानिर्मिती प्रकल्पांना भेट देऊन शास्त्रीय माहिती घेतली. गव्हांकुर निर्मिती करण्याच्या यंत्रणेची किंमत 15 लाख रुपये आहे. निंबाळकरांनी त्यातील तंत्र समजून घेऊन घरालगतच शेडनेटच्या साहाय्याने 15 x 10 फूट आकाराची खोली तयार केली. एका बाजूला दरवाजा बसवला. या खोलीत एकावेळी 75 ट्रे बसतील अशी सोय केली.
गव्हांकुर तयार करताना सुरवातीला वीस लिटर पाण्यात 12 किलो उच्च प्रतीचा गहू 12 तास भिजविला जातो. त्यानंतर पाण्यातून काढून हा गहू पोत्यामध्ये 12 तास दडपून ठेवला जातो. त्यामुळे गव्हाला लवकर कोंब फुटतात. कोंब फुटलेले दीड किलो गहू तीन x दोन फूट आकाराच्या ट्रेमध्ये एकसारखे पसरून ठेवले जातात. हे ट्रे शेडनेटमधील कप्प्यात ठेवले जातात. गव्हांकुरला पाणी देण्यासाठी शेडमध्ये फॉगर्स बसविलेले आहे. त्यास टायमर लावला आहे. दर दोन तासांनंतर या खोलीत पाच मिनिटे पाणी फवारले जाते. शेडसह या तंत्रासाठी त्यांना 30 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. साधारण आठ दिवसांत हे गव्हांकुर सहा इंचांपर्यंत वाढतात. दीड ते दोन किलो गव्हापासून 14 किलो हिरवा चारा तयार होतो. जमिनीवर एक किलो हिरवा चारा तयार करण्यासाठी 60 ते 80 लिटर पाणी लागते. सदरच्या पद्धतीने चारा तयार करताना दोन ते तीन लिटर पाण्यामध्ये एक किलो हिरवा चारा तयार होतो. या तंत्रज्ञानातून दररोज 100 ते 120 किलोपर्यंत हिरवा चारा उपलब्ध होतो. त्यासाठीची साखळी त्यांनी व्यवस्थित बसवली आहे. दररोज उत्पादित होणारा चारा जनावरांना खाण्यास दिल्यानंतर कोंब आलेले गहू पुन्हा ट्रेमध्ये पसरून ठेवतात. या ट्रेमध्ये आठ दिवसांत गव्हांकुर तयार होतात.
...असे झाले फायदे गव्हांकुराचा चारा अत्यंत पाचक असून त्याचे शरीरात 90 टक्क्यांपर्यंत पचन होते. यामुळे गाईंना पोषक आहार मिळाल्याने गाईंचे आरोग्य चांगले राहते. गाईंच्या दुधाची प्रत सुधारली आहे. पूर्णतः पांढरट दूध तयार झाल्याने त्यास चांगली चवही मिळते. या पद्धतीने मक्यापासूनही चारा तयार करता येतो. गव्हांकुरापासून चारानिर्मिती करण्यासाठी प्रतिकिलो केवळ दोन रुपये खर्च येतो. यासाठी मनुष्यबळ कमी लागते. गव्हांकुराच्या वापरामुळे 35 टक्के चारा व 50 टक्के पशुखाद्याची बचत झाल्याचे निंबाळकर सांगतात.
"ऍग्रोवन'मधून मिळाले ऍझोला निर्मितीचे तंत्र.... - निंबाळकरांना दै. ऍग्रोवनमधून ऍझोला निर्मिती तंत्राची माहिती मिळाली. तसेच शिरवळ (ता. खंडाळा) येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील ऍझोला प्रात्यक्षिकाची पाहणी केली. त्यानंतर गोविंद डेअरीतील पशुतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी 18 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 20 सें.मी उंचीचे सिमेंट कॉंक्रिटचे दहा वाफे तयार केले.
-वाफ्यातील संपूर्ण पाणी बाहेर काढण्यासाठी तळाला एक पाइप बसवली आहे. वाफ्याच्या खोलीपासून आठ सेंटिमीटर उंचीवर दुसरी पाइप बसविली. याद्वारे दर पंधरा दिवसांनी वाफ्यातून 25 टक्के पाणी काढून घेतले जाते. हे पाणी पिकाला दिले जाते. वाफ्याच्या खोलीपासून 12 सेंटिमीटरवर तिसरी पाइप बसवली आहे. त्याद्वारे शेडवरून पावसाचे पडणारे पाणी वाहून न जाता त्या पाइपमधून सर्व वाफ्यात समांतर पाणी राहण्याची व्यवस्था केली आहे. या वाफ्यांच्या निर्मितीसाठी त्यांना 45 हजार रुपये खर्च आला आहे.
- वाफ्यामध्ये एका चौरस मीटरसाठी पाच किलो चाळलेली काळी माती, दोन किलो शेण स्लरी, 50 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 10 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून पाणी बारा इंचापर्यंत भरले जाते. सुरवातीला प्रत्येक वाफ्यात ऍझोलाचे एक किलो बियाणे सोडले जाते. ऍझोला ही तरंगती व शेवाळवर्गीय वनस्पती आहे. त्यांची वाढ होऊन 10 ते 12 दिवसांमध्ये पूर्ण वाफे भरले जातात. या वाफ्यातून एक चतुर्थांश ऍझोला दररोज काढून घेतला जातो. हा ऍझोला चाऱ्यासोबत जनावरांना पुरविला जातो. ही नत्र स्थिरीकरण करणारी वनस्पती असून जनावरांमध्ये अन्न पचनासाठी ती उपयुक्त ठरते.
ऍझोलाचे फायदे - सध्या दररोज आठ वाफ्यांमधून 20 किलो ऍझोला मिळतो. ऍझोलामुळे पशुखाद्यामध्ये बचत झाली. यामध्ये प्रथिनांचे चांगले प्रमाण आहे. गाईंना ऍझोला खायला दिल्यानंतर दूध उत्पादनात फरक जाणवला. ऍझोला देण्याअगोदर 3.8 ते 4.0 पर्यंत दुधास फॅट होती. 28.5 ते 29 पर्यंत डिग्री तसेच 8.2 ते 8.5 पर्यंत एसएनएफ होता. त्याचबरोबर दुधात प्रोटिनचे प्रमाण 2.87 ते 2.92 मिळायचे. ऍझोलाचा वापर सुरू केल्यानंतर 4.1 ते 4.4 पर्यंत फॅट पोचली. डिग्री 31 व 9.1 पर्यंत एसएनएफ पोचला. तर 3.1 ते 3.3 पर्यंत प्रोटिनचे प्रमाण मिळत आहे.ऍझोलाच्या वापरामुळे त्यांना 25 टक्क्यांपर्यंत पशुखाद्याची बचत करता आली आहे.
उत्पन्नाचे गणित - दिवसाला प्रति गाईपासून सरासरी 12 लिटर दूध मिळते. सध्या सहा गाईंपासून 70 लिटर दूध जमा होते. उत्पादित दुधाची गुणवत्ता चांगली असल्याने डेअरीकडून इतर उत्पादकांपेक्षा सरासरी तीन ते सहा रुपये प्रतिलिटरला दर वाढवून मिळत आहे. दरमहा दुग्ध व्यवसायातून त्यांना 40 ते 45 हजारांचे उत्पन्न मिळते. मुक्त संचार पद्धतीचा गोठा असल्याने मजूर खर्च अजिबात नाही. निंबाळकर स्वतः व त्यांची पत्नी सौ. छाया तसेच मुले ओंकार व प्रथमेश गोठा व्यवस्थापन सांभाळतात. खाद्य व इतर खर्च वगळता प्रतिमहिना वीस हजार निव्वळ नफा मिळतो.
शेतीमध्ये कोणतेही रासायनिक खत न वापरता पूर्णपणे शेणखताचा वापर करतात. कंपोस्ट व गांडूळ खतही ते शेतावरच तयार करतात. पाण्याची उपलब्धता असणाऱ्या जवळच्या शेतकऱ्यांशी करार करून हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेतात. वर्षाकाठी गोठ्यातून पाच जातिवंत कालवडी तयार होतात. त्या गाभण राहिल्यानंतर विकतात. यातून दरवर्षी दीड लाखाचे उत्पन्न मिळते. त्यांनी प्रत्येक गाईचा विमाही उतरवला आहे. निंबाळकरांनी गोठ्यालगत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्राचीही उभारणी केली आहे.
संपर्क - अनिल निंबाळकर - 9922576549
(सर्व छायाचित्रे - अमोल जाधव)
अमोल जाधव
फलटणच्या दक्षिणेस नऊ किलोमीटरवर विंचुर्णी हे गाव आहे. हे गाव पूर्णतः दुष्काळीपट्ट्यात येते. या गावात अनिल केशवराव निंबाळकर यांची 22 एकर शेती आहे. पाणीपुरवठ्यासाठी एक विहीर असून पाण्याच्या उपलब्धतेनुसार जिरायती पिके आणि जनावरांसाठी चाऱ्याची लागवड केली जाते. सन 1983 पासून निंबाळकर दुग्ध व्यवसायात आहेत. त्यांच्याकडे सहा होल्स्टिन फ्रिजीयन गाई, आठ कालवडी आणि तीन मुऱ्हा म्हशी आहेत. चाऱ्यासाठी त्यांच्याकडे ऊस, नेपिअर गवताच्या डीएचएन-6 जातीची तसेच कडवळाची लागवड असते. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याची कमतरता भासत आहे. चाऱ्याच्या कमतरतेमध्ये जनावरांना पोषक आहार देण्यासाठी त्यांनी गेल्या चार महिन्यांपासून गाईंच्या आहारात ऍझोला तसेच गव्हांकुराचा वापर सुरू केला आहे. या दोन्ही घटकांच्या आहारातील वापरामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत झाली आहे. हा पर्याय त्यांना फायदेशीर ठरला आहे. ...असे आहे गाईंचे व्यवस्थापन - - पाच वर्षांपूर्वी निंबाळकरांनी मुक्त संचार पद्धतीने गाईंचे संगोपन सुरू केले. गोठ्यातच एका बाजूला सावलीसाठी शेड असून तेथे गाईंना पाणी व गव्हाणीची सोय केली आहे. सकाळी सहा वाजता यंत्राद्वारे दूध काढणी केली जाते. त्यानंतर प्रत्येक गाईस 15 किलो गव्हांकुराचा चारा आणि सात किलो ओला व वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी दिली जाते.
- गोठ्यातील टाकीत पाणी भरलेले असते, त्यामुळे गाई दिवसभर गरजेनुसार पाणी पितात.
- सायंकाळी चार वाजता प्रत्येक गाईला दहा किलो ओला व वाळलेला चारा कुट्टी तसेच अर्धा किलो सरकी पेंड, दीड किलो गव्हाच्या भुसा, एक किलो ऍझोला, वीस ग्रॅम खनिज मिश्रण एकत्र करून दिले जाते. दररोज 15 ते 20 किलो मूरघास गाईंना दिला जातो. सायंकाळी सहा वाजता यंत्राद्वारे दुधाची काढणी होते.
-मुक्त संचार पद्धतीमुळे गाईंना चांगला व्यायाम होतो, त्या चांगल्याप्रकारे रवंथ करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहून दुधात सातत्य टिकते. गाईंना अंग घासण्यासाठी गोठ्यात मध्यभागी खांब उभा केला आहे. त्यावर गाईंना गरजेनुसार अंग घासता येते.
- दर तीन महिन्यांनंतर पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार जंतनिर्मूलन आणि शिफारशीनुसार लसीकरण केले जाते.
- गाई माजावर आल्यावर कृत्रिम रेतन पद्धतीचा वापर करून भरविल्या जातात.
- तीन म्हशींसाठी स्वतंत्र गोठा बांधला आहे.
हायड्रोपोनिक्स तंत्राने गव्हांकुर चारानिर्मिती - दुग्ध व्यवसायाच्यादृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाईंसाठी सकस चाऱ्याची उपलब्धता. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर विचार करत असताना निंबाळकरांना फलटण येथील गोविंद दूध डेअरीच्या माध्यमातून गव्हांकुरापासून चारानिर्मितीचा मार्ग गवसला. त्यांनी कृषी संशोधन केंद्र, मडगाव (गोवा) येथील गव्हांकुर चारानिर्मिती प्रकल्पांना भेट देऊन शास्त्रीय माहिती घेतली. गव्हांकुर निर्मिती करण्याच्या यंत्रणेची किंमत 15 लाख रुपये आहे. निंबाळकरांनी त्यातील तंत्र समजून घेऊन घरालगतच शेडनेटच्या साहाय्याने 15 x 10 फूट आकाराची खोली तयार केली. एका बाजूला दरवाजा बसवला. या खोलीत एकावेळी 75 ट्रे बसतील अशी सोय केली. गव्हांकुर तयार करताना सुरवातीला वीस लिटर पाण्यात 12 किलो उच्च प्रतीचा गहू 12 तास भिजविला जातो. त्यानंतर पाण्यातून काढून हा गहू पोत्यामध्ये 12 तास दडपून ठेवला जातो. त्यामुळे गव्हाला लवकर कोंब फुटतात. कोंब फुटलेले दीड किलो गहू तीन x दोन फूट आकाराच्या ट्रेमध्ये एकसारखे पसरून ठेवले जातात. हे ट्रे शेडनेटमधील कप्प्यात ठेवले जातात. गव्हांकुरला पाणी देण्यासाठी शेडमध्ये फॉगर्स बसविलेले आहे. त्यास टायमर लावला आहे. दर दोन तासांनंतर या खोलीत पाच मिनिटे पाणी फवारले जाते. शेडसह या तंत्रासाठी त्यांना 30 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. साधारण आठ दिवसांत हे गव्हांकुर सहा इंचांपर्यंत वाढतात. दीड ते दोन किलो गव्हापासून 14 किलो हिरवा चारा तयार होतो. जमिनीवर एक किलो हिरवा चारा तयार करण्यासाठी 60 ते 80 लिटर पाणी लागते. सदरच्या पद्धतीने चारा तयार करताना दोन ते तीन लिटर पाण्यामध्ये एक किलो हिरवा चारा तयार होतो. या तंत्रज्ञानातून दररोज 100 ते 120 किलोपर्यंत हिरवा चारा उपलब्ध होतो. त्यासाठीची साखळी त्यांनी व्यवस्थित बसवली आहे. दररोज उत्पादित होणारा चारा जनावरांना खाण्यास दिल्यानंतर कोंब आलेले गहू पुन्हा ट्रेमध्ये पसरून ठेवतात. या ट्रेमध्ये आठ दिवसांत गव्हांकुर तयार होतात.
...असे झाले फायदे गव्हांकुराचा चारा अत्यंत पाचक असून त्याचे शरीरात 90 टक्क्यांपर्यंत पचन होते. यामुळे गाईंना पोषक आहार मिळाल्याने गाईंचे आरोग्य चांगले राहते. गाईंच्या दुधाची प्रत सुधारली आहे. पूर्णतः पांढरट दूध तयार झाल्याने त्यास चांगली चवही मिळते. या पद्धतीने मक्यापासूनही चारा तयार करता येतो. गव्हांकुरापासून चारानिर्मिती करण्यासाठी प्रतिकिलो केवळ दोन रुपये खर्च येतो. यासाठी मनुष्यबळ कमी लागते. गव्हांकुराच्या वापरामुळे 35 टक्के चारा व 50 टक्के पशुखाद्याची बचत झाल्याचे निंबाळकर सांगतात.
"ऍग्रोवन'मधून मिळाले ऍझोला निर्मितीचे तंत्र.... - निंबाळकरांना दै. ऍग्रोवनमधून ऍझोला निर्मिती तंत्राची माहिती मिळाली. तसेच शिरवळ (ता. खंडाळा) येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील ऍझोला प्रात्यक्षिकाची पाहणी केली. त्यानंतर गोविंद डेअरीतील पशुतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी 18 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 20 सें.मी उंचीचे सिमेंट कॉंक्रिटचे दहा वाफे तयार केले.
-वाफ्यातील संपूर्ण पाणी बाहेर काढण्यासाठी तळाला एक पाइप बसवली आहे. वाफ्याच्या खोलीपासून आठ सेंटिमीटर उंचीवर दुसरी पाइप बसविली. याद्वारे दर पंधरा दिवसांनी वाफ्यातून 25 टक्के पाणी काढून घेतले जाते. हे पाणी पिकाला दिले जाते. वाफ्याच्या खोलीपासून 12 सेंटिमीटरवर तिसरी पाइप बसवली आहे. त्याद्वारे शेडवरून पावसाचे पडणारे पाणी वाहून न जाता त्या पाइपमधून सर्व वाफ्यात समांतर पाणी राहण्याची व्यवस्था केली आहे. या वाफ्यांच्या निर्मितीसाठी त्यांना 45 हजार रुपये खर्च आला आहे.
- वाफ्यामध्ये एका चौरस मीटरसाठी पाच किलो चाळलेली काळी माती, दोन किलो शेण स्लरी, 50 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 10 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून पाणी बारा इंचापर्यंत भरले जाते. सुरवातीला प्रत्येक वाफ्यात ऍझोलाचे एक किलो बियाणे सोडले जाते. ऍझोला ही तरंगती व शेवाळवर्गीय वनस्पती आहे. त्यांची वाढ होऊन 10 ते 12 दिवसांमध्ये पूर्ण वाफे भरले जातात. या वाफ्यातून एक चतुर्थांश ऍझोला दररोज काढून घेतला जातो. हा ऍझोला चाऱ्यासोबत जनावरांना पुरविला जातो. ही नत्र स्थिरीकरण करणारी वनस्पती असून जनावरांमध्ये अन्न पचनासाठी ती उपयुक्त ठरते.
ऍझोलाचे फायदे - सध्या दररोज आठ वाफ्यांमधून 20 किलो ऍझोला मिळतो. ऍझोलामुळे पशुखाद्यामध्ये बचत झाली. यामध्ये प्रथिनांचे चांगले प्रमाण आहे. गाईंना ऍझोला खायला दिल्यानंतर दूध उत्पादनात फरक जाणवला. ऍझोला देण्याअगोदर 3.8 ते 4.0 पर्यंत दुधास फॅट होती. 28.5 ते 29 पर्यंत डिग्री तसेच 8.2 ते 8.5 पर्यंत एसएनएफ होता. त्याचबरोबर दुधात प्रोटिनचे प्रमाण 2.87 ते 2.92 मिळायचे. ऍझोलाचा वापर सुरू केल्यानंतर 4.1 ते 4.4 पर्यंत फॅट पोचली. डिग्री 31 व 9.1 पर्यंत एसएनएफ पोचला. तर 3.1 ते 3.3 पर्यंत प्रोटिनचे प्रमाण मिळत आहे.ऍझोलाच्या वापरामुळे त्यांना 25 टक्क्यांपर्यंत पशुखाद्याची बचत करता आली आहे.
उत्पन्नाचे गणित - दिवसाला प्रति गाईपासून सरासरी 12 लिटर दूध मिळते. सध्या सहा गाईंपासून 70 लिटर दूध जमा होते. उत्पादित दुधाची गुणवत्ता चांगली असल्याने डेअरीकडून इतर उत्पादकांपेक्षा सरासरी तीन ते सहा रुपये प्रतिलिटरला दर वाढवून मिळत आहे. दरमहा दुग्ध व्यवसायातून त्यांना 40 ते 45 हजारांचे उत्पन्न मिळते. मुक्त संचार पद्धतीचा गोठा असल्याने मजूर खर्च अजिबात नाही. निंबाळकर स्वतः व त्यांची पत्नी सौ. छाया तसेच मुले ओंकार व प्रथमेश गोठा व्यवस्थापन सांभाळतात. खाद्य व इतर खर्च वगळता प्रतिमहिना वीस हजार निव्वळ नफा मिळतो.
शेतीमध्ये कोणतेही रासायनिक खत न वापरता पूर्णपणे शेणखताचा वापर करतात. कंपोस्ट व गांडूळ खतही ते शेतावरच तयार करतात. पाण्याची उपलब्धता असणाऱ्या जवळच्या शेतकऱ्यांशी करार करून हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेतात. वर्षाकाठी गोठ्यातून पाच जातिवंत कालवडी तयार होतात. त्या गाभण राहिल्यानंतर विकतात. यातून दरवर्षी दीड लाखाचे उत्पन्न मिळते. त्यांनी प्रत्येक गाईचा विमाही उतरवला आहे. निंबाळकरांनी गोठ्यालगत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्राचीही उभारणी केली आहे.
संपर्क - अनिल निंबाळकर - 9922576549
(सर्व छायाचित्रे - अमोल जाधव)
पशुखाद्यासाठी ऍझोला
ऍझोलामध्ये आवश्यक अमिनो आम्ले, जीवनसत्त्वे, क्षार आणि शरीर वाढीसाठी आवश्यक घटक मुबलक प्रमाणात आहेत. ऍझोलामध्ये उच्च प्रथिने आणि कमी लिग्निन असल्याने जनावरे ऍझोला सहज पचवू शकतात. ऍझोलाचे घरच्या घरी कमी खर्चात उत्पादन घेणे शक्य आहे. डॉ. देवेंद्र जाधव, डॉ. आझाद कादरभाई
ऍझोलामध्ये विविध खाद्य घटक जसे प्रथिने, आवश्यक अमिनो आम्ले, जीवनसत्त्वे (अ, ब आणि बीटा कॅरोटिन), क्षार (कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, लोह, तांबे, मॅग्नेशिअम) व शरीरवाढीसाठी आवश्यक घटक मुबलक प्रमाणात असतात. शुष्क घटकांच्या प्रमाणानुसार, ऍझोलामध्ये 25-35 टक्के प्रथिने, 10 ते 15 टक्के क्षार आणि 7 ते 10 टक्के अमिनो आम्ले, जैविक घटक पॉलिमर असतात. ऍझोलामध्ये उच्च प्रथिने आणि कमी लिग्निन असल्याने जनावरे ऍझोला सहज पचवू शकतात. जनावरांना ऍझोला थेट अथवा खुराकात मिसळून देता येते. गाई, म्हशी, शेळी, वराह, कोंबड्यांना ऍझोलाचा खाद्य म्हणून वापर करता येतो.
...असे घ्या ऍझोला उत्पादन * ऍझोला लागवड करावयाच्या ठिकाणच्या जमीन समतल करावी.
* वाफा तयार करण्यासाठी विटांची 2 मी. x 2 मी.चौरसाकृती रचना करावी.
* 2 मी. x 2 मी. आकाराचे प्लॅस्टिकचे कापड विटांनी बनविलेल्या चौरसाकृती खड्ड्यामध्ये अंथरावे.
* 10 ते 15 किलो चाळून घेतलेली चांगली माती खड्ड्यामध्ये पसरावी.
* दोन किलो शेण, 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट हे 10 लिटर पाण्यात मिसळून एकजीव करून खड्ड्यात कागदावरील मातीवर पसरवून गादी करावी. त्यावर पाण्याची पातळी 10 सें.मी. होईपर्यंत पाणी टाकावे. बायोगॅस युनिटमधील स्लरी व जनावरांच्या गोठ्यातील, स्वयंपाक घरातील वाया जाणारे पाणीदेखील ऍझोला खड्ड्यात वापरता येऊ शकते.
* त्यामध्ये 500 ग्रॅम ते एक किलो ऍझोलाचे कल्चर समप्रमाणात पसरावे. त्यावर ताजे पाणी शिंपडावे.
* एक आठवड्यात ऍझोला चांगले वाढते. जाड हिरव्या गालिच्याप्रमाणे दिसू लागते.
* 20 ग्रॅम सुपर फॉस्फेट व एक किलो शेणाचे पाण्यातील मिश्रण पाच दिवसांपासून एकदा या खड्ड्यात मिसळावे. जेणेकरून ऍझोलाची वाढ झपाट्याने होऊन दैनंदिन 500 ग्रॅम उत्पादन मिळेल.
* शिफारशीनुसार मॅग्नेशिअम, लोह, तांबे, सल्फर इ. क्षार असणारे मिश्रण दर आठवड्याला यात मिसळावे.
* दर महिन्यातून एकदा पाच किलो चाळलेली माती या खड्ड्यात मिसळावी, यामुळे मातीतील जास्तीचे नायट्रोजन जमा होऊन अन्नघटकांची कमतरता होणार नाही.
* दर सहा महिन्यांनी गादीमधील माती, पाणी बदलावे. नवीन ऍझोला कल्चर यात सोडावे.
* जर ऍझोलामध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्याची विल्हेवाट लावून नव्याने ऍझोला लागवड करावी.
* सुरवातीच्या लागवडीनंतर 15 दिवसांनी रोज उत्पादन मिळू शकते. ऍझोला गोळा करण्यासाठी चाळणी वापरावी.
* ऍझोला वेगाने वाढतो आणि रोज 500 ते 600 ग्रॅम ऍझोला उत्पादन मिळू शकते.
* गोळा केलेला ऍझोला स्वच्छ पाण्यात धुवावा जेणेकरून त्याचा शेणाचा वास निघून जाईल.
* ऍझोला वाढीसाठी तापमान 20 ते 28 अंश सेल्सिअस, स्वच्छ सूर्यप्रकाश, 60 ते 80 टक्के आर्द्रता योग्य प्रमाणात पाणी (पाच ते 12 सें.मी.) आणि सामू चार ते 7.5 इतका योग्य असतो.
ऍझोला उत्पादनाबाबत थोडेसे महत्त्वाचे - * ऍझोला धुण्याच्या वेळी जाळीवर धुतला तर छोटे वाढ न झालेले ऍझोलाचे तुकडे चाळून बाहेर येतात. हे तुकडे पुन्हा ऍझोला खड्ड्यामध्ये सोडावेत.
* तापमान 25 अंश सेल्सिअसचे आत राखल्यास वाढ जोमाने होते.
* ऍझोला खड्ड्याच्यावर शेडनेट बांधल्यास तीव्र सूर्यप्रकाशापासून त्याचे संरक्षण होईल.
* उत्पादित ऍझोला रोजचे रोज काढणे आवश्यक आहे. अन्यथा, खड्ड्यामध्ये ऍझोला वाढीसाठी कमी जागा उरेल.
* दुधाळ जनावरांवर घेतलेल्या चाचण्यांद्वारे असे सिद्ध झाले आहे, की रोजच्या आहारात दोन ते तीन किलो ऍझोला मिसळला तर जनावरांच्या दुधात सर्वसाधारणपणे 15 ते 20 टक्के वाढ होते.
* दुग्ध उत्पादनात कोणताही बदल न होता, ऍझोला हे जनावरांच्या खुराकासाठी 15 ते 20 टक्के इतक्या प्रमाणात योग्य बदली खाद्य म्हणून वापरता येते. शिवाय दुधाची गुणवत्ता वाढते. जनावरांची तब्येत चांगली राहून आयुष्यमान वाढते.
संपर्क - डॉ. कादरभाई - 9763707898
(लेखक पशुवैद्यकीय चिकित्सालय, सातारा येथे कार्यरत आहेत.)

सुधारित तंत्र व व्यवस्थापनासून साकरला दुग्घव्यवसाय
जोडधंद्याची जोड दिल्यास शेती फायदेशीर ठरते. शिवाय जोडधंद्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांचे जीवनमानही उंचावते. सोनार कामाचा पारंपरिक व्यवसाय सुरू ठेवीत पुसद (जि. यवतमाळ) येथील उमेश पंधे यांनी भोजला येथे पंधे डेअरी फार्म सुरू केला. गाई-म्हशींची सुयोग्य देखभाल व गोठा व्यवस्थापन ते करतात. दर दिवशी 150 लिटर दुधाच्या संकलनातून नफाही समाधानकारक मिळत आहे. आमीन चौहान
उमेश व गणेश पंधे बंधूंकडे वडिलोपार्जित सहा एकर ओलिताची शेती आहे. पारंपरिक शेती करीत असतानाच या बंधूनी नोव्हेंबर 2011 मध्ये म्हैस विकत घेतली. त्यापासून बारा लिटर दूध दररोज मिळायचे. निम्मे दूध घरी ठेवून उर्वरित दुधाची ते घरूनच विक्री करीत. दुधाचा दर्जा चांगला ठेवल्याने मागणी वाढू लागली. त्याप्रमाणे व्यवसाय वाढविण्याचा निर्णय पंधे बंधूंनी घेतला. परभणी बाजारातून सहा जाफराबादी व चार मुऱ्हा म्हशी, तर नगर जिल्ह्यातील लोणी येथून 11 होलस्टिन फ्रिजीयन व एक फुले- त्रिवेणी अशा गाई विकत घेतल्या. आज त्यांच्याकडे 11 म्हशी व 12 गाई आहेत.
-जाफराबादी म्हशीच्या दुधाला फॅट चांगला मिळतो, तर फुले त्रिवेणीपासून भरपूर दूध मिळते.
-मुऱ्हा म्हशी स्वभावाने काहीशा चंचल असल्या तरी भरपूर दूध देतात. मात्र जाफराबादीच्या तुलनेत दूध पातळ असते.
...असे आहे गोठा व्यवस्थापन * जनावरांना बाराही महिने हिरवा चारा पुरविण्याचे नियोजन
* वर्षभर पुरेल एवढा कोरडा चारा विकत घेऊन साठवला जातो.
* कडबा कुट्टीद्वारे जनावरांना दिला जातो.
* वर्षभर चाऱ्यासाठी एक एकरात मका व यशवंत फुले गवताची लागवड
* तोंडखुरी व पायखुरी या रोगांसाठी नियमित लसीकरण, कासदाह रोग होऊ नये यासाठी काळजी.
* गोठ्यातील शेण ट्रॉलीद्वारे उचलले जाते.
* गोठा रोज धुऊन स्वच्छ केला जातो.
* दर आठवड्याला जनावरांची तपासणी
-जनावरांच्या निगेसाठी एक जोडपे ठेवले आहे.
-जनावरांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी पशुचिकित्सक
-पिण्याच्या पाण्यासाठी गोठ्यातच पाइपलाइनद्वारे व्यवस्था
गाई व म्हशींच्या देखभालीसाठी 50 x 35 फुटाचे लोखंडी अँगलचे शेड. वरती कापडी आच्छादन व खाली सिमेंटचा बेड. दोन्ही बाजूला सिमेंटच्या पक्क्या गव्हाणी. गोठ्यात 'टेल टू टेल' पद्धतीने जनावरे बांधली जातात. एका बाजूने गाई तर दुसऱ्या बाजूने म्हशी बांधतात. गाईंसाठी मुक्त संचार गोठा पद्धत सुरू केली आहे.
दुधाची काढणी यंत्राद्वारे होते. गोठा धुण्यासाठी पंधे यांनी स्वतःची पद्धत विकसित केली आहे. गव्हाणीला लागून जमिनीपासून दीड फूट उंच आडवे पीव्हीसी पाइप लावले आहेत. त्यांना विशिष्ट अंतरावर छिद्रे पाडली आहेत. पाणीपुरवठ्याच्या विहिरीवरील मोटारीला हा पाइप जोडला असून गोठा स्वच्छ करण्याच्या वेळी विशिष्ट दाबाने पाइपमधून पाणी येते. त्यामुळे दोन जनावरांच्या मधल्या जागेतून शेण निघून मधल्या नालीतून गोठ्याबाहेर संकलित होते. अशाप्रकारे कमी श्रमात गोठा स्वच्छ केला जातो. पशुचिकित्सक डॉ. सी. पी. भगवतकर व डॉ. काईट यांचे मार्गदर्शन मिळते. वडील दीपक पंधे व भाऊ गणेश यांचे मार्गदर्शन व मदत उमेश यांना होते.
दूध उत्पादन व विक्री गाईंचे 100 लिटर व म्हशींचे 50 लिटर मिळून दररोज सुमारे 150 लिटर दूध मिळते. गाईच्या दुधाला प्रति लिटर 25 रु. तर म्हशीच्या दुधाला 40 रु. दर मिळतो. 100 लिटर दूध खासगी डेअरीला, तर 50 लिटर दुधाची घरूनच किरकोळ विक्री होते. दररोजच्या दूध विक्रीतून 4500 रुपये मिळतात. दररोजचा खर्च 2500 रु. वजा जाता 2000 रु निव्वळ नफा उरतो.
उप-उत्पादन - जनावरांपासून मिळणारे अर्धे शेणखत शेताला उपयोगी पडते. दोन एकरात पंधे यांना यंदा वीस क्विंटल कापूस झाला. एक एकर सेंद्रिय पपईपासून 50 हजारांचे उत्पन्न मिळाले. उर्वरित शेणखताची विक्री होते. आतापर्यंत एक लाख रुपयांच्या शेणखताची विक्री केली आहे. शेणखताचा दर्जा चांगला असल्याने परिसरातील शेतकऱ्यांकडून त्याला मागणी आहे. रेडे आणि गोऱ्ह्यांची विक्री न करण्याचा पंधे यांचा संकल्प असून नजीकच्या माहूर येथील रेणुका देवस्थानाच्या गोरक्षण संस्थानास ते दान केले जातात. आतापर्यंत सात रेडे व दोन गोऱ्हे दान केले आहेत.
पंधे बंधूंकडून शिकण्यासारखे काही - * पाणी, जागा व चारा यांचे योग्य नियोजन करूनच दुग्ध व्यवसाय करावा
* दूरदृष्टी ठेवूनच चाऱ्याचे नियोजन आवश्यक.
* मजूर नसल्यास स्वतः काम करण्याची तयारी ठेवावी.
* घरपोच दुधाची विक्री व्यवस्था उभारल्यास नफा वाढतो.
* नव्या गाई विकत आणल्यावर बदललेल्या वातावरणाचा परिणाम म्हणून प्रारंभी पुरेसे उत्पादन मिळत नाही.
* म्हशींच्या तुलनेत गाईंची जास्त काळजी घ्यावी लागते.
* स्थानिक बाजारात घरगुती ग्राहक म्हशीच्या दुधाला प्राधान्य देतात.
* घरगुती ग्राहक दुधाला जास्त भाव देतात.
* मुक्त गोठा पद्धती म्हशींपेक्षा गाईसाठी उपयुक्त.
* शेतीविषयक साहित्य, पुस्तके वाचण्याची आवड. त्यातूनच दुग्ध व्यवसायाविषयी माहिती मिळविली.
जास्त परिश्रम घेऊन दुधाच्या विक्रीसाठी दारोदार हिंडावे लागते. तरीही हा व्यवसाय वाढविणार आहे. जनावरांची संख्या वाढवून शहरात दुग्ध विक्री केंद्र तसेच दुग्ध प्रक्रिया उद्योग उभा करण्याचा मानस असल्याचे पंधे म्हणाले.
संपर्क - उमेश पंधे, 9822592553
पंधे डेअरी फार्म, भोजला, ता. पुसद, जि. यवतमाळ - 9822592553
गिरिधर ठेंगे, (8575394868)

Subscribe to:
Comments (Atom)